18.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील श्री नारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन संपन्न

18.05.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील श्री नारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन संस्थेच्या चेंबूर येथील श्री नारायण शिक्षण संकुल परिसरात संपन्न झाला. कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील, श्री नारायण मंदिर समितीचे अध्यक्ष एम आय दामोदरन, चेअरमन एन मोहनदास, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू, महासचिव ओ के प्रसाद व इतर पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.