18.04.2025: राज्यपालांच्या हस्ते पुणे येथे सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठीचे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान

18.04.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठी ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ राज्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा परीक्षक व क्रीडा प्रशासकांना प्रदान केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, लोक प्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्तकर्ते, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा प्रशासक यावेळी उपस्थित होते.