18.02.2026: राज्यपालांनी विवेक भीमनवार यांना दिली लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ
18.02.2026: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ लोकभवन, मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात दिली. शपथविधीनंतर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
शपथविधी सोहळ्याला आयोगाचे माजी अध्यक्ष रजनीश सेठ, कार्यवाहू अध्यक्ष डॉ अभय वाघ, आयोगाचे सदस्य, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, शासनाचे अधिकारी तसेच भीमनवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विवेक भीमनवार यांच्या नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना वाचली.