17.12.2024: राज्यपालांच्या हस्ते भारतीय राजस्व सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ
17.12.2024: राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे सुरु होत असलेल्या भारतीय राजस्व सेवेच्या ७८ व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एनएडीटीच्या सभागृहात झाला. यावेळी राज्यपालांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले. उदघाटन सत्राला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य (करदाता सेवा व महसूल) हरिंदर बीर सिंह गिल, नवी दिल्ली येथील प्रधान महासंचालक (प्रशिक्षण) संजय बहादूर, एनएडीटीचे महासंचालक (प्रशिक्षण) पी. सेल्वागणेश, एनएडीटीचे अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मुनीश कुमार, एनएडीटीचे अतिरिक्त महासंचालक (इंडक्शन) शिद्दरामप्पा कप्पत्तनावार, एनएडीटीच्या भारतीय राजस्व सेवेच्या ७८ व्या तुकडीचे अतिरिक्त संचालक व अभ्यासक्रम संचालक अंकुर आल्या, अध्यापक, ७८ व्या तुकडीतील भारतीय राजस्व सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी व त्यांचे पालक उपस्थित होते.