17.10.2024: राज्यपालांच्या हस्ते जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
17.10.2024: ‘शाश्वत विकासासाठी हरित व नवीनीकरणीय ऊर्जा’ या विषयावर जागतिक व्यापार केंद्र मुंबई तर्फे आयोजित पाचव्या जागतिक व्यापार प्रदर्शनाचे (वर्ल्ड ट्रेड एक्स्पो) उदघाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण विभागाचे माजी सचिव तसेच द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) चे मानद फेलो अजय शंकर, जागतिक व्यापार केंद्र मुंबई तसेच ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विजय कलंत्री, उपाध्यक्ष कॅप्टन सोमेश बत्रा, कार्यकारी संचालक रूपा नाईक, विविध देशांचे वाणिज्यदूत व व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला राज्यपालांनी जागतिक व्यापार प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध स्टाल्सला भेट दिली.