17.09.2023 : राज्यपालांच्या दुरस्थ उपस्थितीत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संशोधक छात्र-भवनाचे लोकार्पण व राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
17.09.2023 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थी भवन आणि कुलगुरू निवासस्थानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘संस्कृत साहित्यातील पाठ्यचिकित्सा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे देखील उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. मुरली मनोहर पाठक, विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, परिषदेच्या समन्वयिका प्रो. कविता होले व प्रा. पराग जोशी तसेच प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वैदर्भी’ या विद्यापीठाच्या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच कुलगुरूंच्या हस्ते कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.