17.09.2022 : क्षयरोग मुक्त भारत अभियानात महाराष्ट्राने देशात आघाडी घ्यावी: राज्यपाल

17.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे ‘पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राज्यातील क्षयरुग्णांच्या पोषण आहाराची आर्थिक जवाबदारी स्वीकारणार्या 100 निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी क्षयरुग्णांच्या नातेवाईकांना पोषण आहार सामग्रीचे देखील वितरण करण्यात आले.