17.07.2026: राज्यपालांच्याउपस्थितीत पुणे येथे ‘डिजी 100 एक्स महाराष्ट्र’ परिसंवादाचे समारोप सत्र संपन्न
17.07.2026: राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे ‘डिजी 100 एक्स महाराष्ट्र’ या उच्च शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि स्टार्ट-अप्स विषयावरील परिसंवादाचे समारोप सत्र संपन्न झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, MITRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रकुलपती डॉ. विद्या येरवडेकर, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक रत्नाकर पै, ‘डिजी’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत सहल यांच्यासह उच्च शिक्षण संस्थांचे प्रमुख, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.