17.06.2026: विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांच्या अनौपचारिक परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
17.06.2026: विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांच्या अनौपचारिक परिषदेचे उदघाटन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत बॉम्बे जिमखाना येथे संपन्न झाले. ‘गेट वे हाऊस’ या संस्थेमार्फत वाणिज्यदूतांच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यामध्ये वाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वाची भूमिका असून महाराष्ट्रासोबत व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यामध्ये मुंबईस्थित वाणिज्यदूत महत्वाचे योगदान देतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. ‘गेट वे हाऊस’च्या कार्यकारी संचालक मनजित कृपलानी यांनी प्रास्ताविक केले, तर एझेडबीचे सहसंस्थापक बेहराम वकील यांनी आभार प्रदर्शन केले.