17.06.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई पब्लिक स्कुल च्या नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत समारंभ संपन्न

17.06.2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कुल शाळेचा नव्या शैक्षणिक सत्राचा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव स्वागत समारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या वरळी मुंबई येथील शैक्षणिक परिसरात संपन्न झाला. यावेळी राज्यपालांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक व प्रशासकांशी संवाद साधला तसेच मुलांना शालेय वस्तू व चॉकोलेट्सचे वाटप केले. राज्यपालांनी शाळेतील वर्गखोल्यांची पाहणी केली तसेच खगोलशास्त्र प्रयोगशाळेला भेट दिली. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, महानगरपालिका उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.