17.06.2023 राज्यपालांच्या उपस्थित आमदार व पीठासीन अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय आमदार परिषदेचा समारोप समारंभ संपन्न
17.06.2023 : मुंबई येथे आयोजित तीन दिवसांच्या आमदार व पीठासीन अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय आमदार परिषदेचा समारोप समारंभ राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिओ कॉन्व्हेंशन सेंटर, मुंबई येथे झाला. समारोप सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील व मीरा कुमार, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे, डाॅ. विश्वनाथ कराड, निमंत्रक डाॅ. राहुल कराड व विविध राज्यांचे पीठासीन अधिकारी व आमदार उपस्थित होते. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.