17.03.2025: नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

17.03.2025: नॅशनल डिफेन्स कॉलेज नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय सुरक्षा व रणनीती’ विषयक अभ्यासक्रमात सहभागी होत असलेल्या नागरी सेवा, राजस्व सेवा तसेच भारतीय व मित्र देशांच्या सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या अभ्यासक्रमाचे संयोजक मेजर जनरल हरकिरत सिंह यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळामध्ये झाम्बिया, युनायटेड किंगडम, मोरोक्को, दक्षिण कोरिया येथील वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांचा तसेच भारतीय राजस्व सेवा व सैन्यदलातील ब्रिगेडियर्स पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता.