17.02.2025: राज्यपालांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन

17.02.2025: नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे करण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आलेल्या या गीतासोबत राज्याचा गौरवशाली इतिहास दाखविण्यात आला आहे. ‘आम्ही असू अभिजात’ या संमेलन गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर, संगीतकार आनंदी विकास, गायक मंगेश बोरगावकर, समन्वयक विकास सोनताटे, तसेच आयोजक संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.