17.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत एसएनडीटी महिला विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

17.02.2025: राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठाचा ७४ वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला एकात्मिक संशोधन आणि विकास कृतीच्या कार्यकारी संचालिका डॉ. ज्योती पारिख, विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु डॉ. रूबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख, शैक्षणिक आणि अशैक्षणिक कर्मचारी, तसेच स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारोहात १५,३९२ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण ४६ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात आली तर ७७ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.