16.12.2024: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न
16.12.2024: राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११२ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे, प्रकुलगुरु प्रा. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. संजय कवीश्वर यांसह विद्यापीठातील विविध विभाग प्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारंभात एकूण १,०३,३०३ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान करण्यात आले. यामध्ये स्नातक पदवीधर ८४,३१०, स्नातकोत्तर पदवीधर १८,७७२ तसेच २२१ पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.