16.12.2020 : राजभवन येथे ३४ करोना योद्धा सन्मानित

16.12.2020 : करोना काळात अनेकदा रक्तदान व प्लाझ्मा दान करून लोकांना जीवन दान देणाऱ्या जनसामान्य कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रात निरपेक्षतेने कार्य करणाऱ्या ३४ करोना योद्ध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीतर्फे आयोजित करोना योद्ध्यांच्या या सत्कार सोहळ्यामध्ये पत्रकार, संपादक, अन्नधान्य व मास्क वितरण करणारे समाजसेवी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व पोलीस कर्मचारी यांचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार राजेंद्र साळसकर, बांधकाम व्यावसायिक राहुल हजारे तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.