16.10.2023 : राज्यपालांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
16.10.2023 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहविज्ञान व शरीरशास्त्र या विषयावरील एका सामायिक क्रमिक पुस्तकाचे राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या संस्थेने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व मिल्टन कंपनीच्या सहकार्याने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी खासदार संजीव नाईक, रोटरी जिल्हा ३१४२ चे गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटचे अध्यक्ष सुकुमारन नायर, चेतना सिंह, ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशनचे अरुण पारसकर, प्रकल्प प्रमुख पियुष नागदा, बलजिंदर सिंग कुमार, अजित चव्हाण, धनंजय सिंह, मिल्टन कंपनीचे अधिकारी तसेच बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी उपस्थित होते.