16.08.2026: राज्यपालांच्या उपस्थितीत सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ सपंन्न
16.08.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा तीसरा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दहा गुणवत्ताप्राप्त स्नातकांना सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. तीस पदव्युत्तर स्नातकांना प्रथम स्थान पटकावाल्यांबद्दल प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठात मुलींसाठी ४०० क्षमतेचे वसतिगृह बांधण्याची घोषणा केली. समारोहाला विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, सीओईपी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुनील भिरूड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, सीओईपी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ दयाराम सोनावणे व परीक्षा व मूल्यमापन संचालक यशोधरा हरिभक्त उपस्थित होते. दीक्षांत समारोहात ८८९ स्नातकांना पदवी तसेच ५८२ स्नातकांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या.