16.07.2025 : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

16.07.2025: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावातील शेतकऱ्यांना जमीन वाटप प्रकरणासंदर्भात त्यांनी राज्यपालांना निवेदन सादर केले.