16.03.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत इफ्तार सोबत ‘सहिष्णुता व सहअस्तित्व’ या विषयावर एका सर्वधर्म परिसंवाद संपन्न

16.03.2025 :संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासातर्फे रविवारी रमझान इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या इफ्तार सोबत ‘सहिष्णुता व सहअस्तित्व’ या विषयावर एका सर्वधर्म परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् मर्झुकी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय पारपत्र अधिकारी राजेश गावंडे तसेच विविध धर्मांचे धर्मगुरू व प्रतिनिधी उपस्थित होते.