16.03.2024: राज्यपालांनी सर्व भारतीय प्रौद्योगिकी संस्था-आयआयटीच्या कुलसचिवांच्या दोन दिवसांच्या परिषदेला संबोधन केले

16.03.2024: मुंबई येथे आयोजित देशभरातील सर्व भारतीय प्रौद्योगिकी संस्था – आयआयटीच्या कुलसचिवांच्या दोन दिवसांच्या परिषदेला राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे संबोधित केले. ‘जागतिक दर्जाच्या विद्यापीठ प्रशासनाची निर्मिती’ या विषयावर मुंबई आयआयटीच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई आयआयटीचे अधिष्ठाता (प्रशासन) प्रो. नंद किशोर, रजिस्ट्रार गणेश भोरकडे, प्रा. फिलिपोस, डॉ नयन दाभोलकर तसेच देशभरातील १८ आयआयटीचे रजिस्ट्रार उपस्थित होते.