16.01.2021 : ‘कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॲबिलिटी’ या संस्थेतर्फे करोना योध्द्यांचा सत्कार
‘कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अँड डिसॲबिलिटी’ या संस्थेतर्फे राजभवन नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना योध्द्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे, ‘कॉमनवेल्थ असोसिएशनचे’ अध्यक्ष डॉ.उदय बोधनकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात डॉ. सुनील खापर्डे, प्रो. संजय झोडपे, डॉ. विरल कामदार, डॉ. सुशांत मेश्राम, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. आशिष सातव, कविता सातव, डॉ. अविनाश गावंडे, डॉ गिरीश चरडे, डॉ. प्रीती मानमोडे, डॉ. ज्ञानेश ढाकुलकर यांसह एकूण २२ करोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.