15.12.2020 : स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण
15.12.2020 : स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून पद ग्रहण करणे हा आपला सन्मान असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी राज्यपालांना मानचिन्ह आणि स्कार्फ प्रदान केला.