15.11.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत जनजातीय गौरव दिन साजरा
15.11.2021: आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे पहिल्या जनजातीय गौरव दिनाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते सामुहिक वन हक्क दावे लाभार्थी, वैयक्तिक वन हक्क दावे लाभार्थी, वनहक्क पट्टे मिळालेले लाभार्थी, महाराष्ट्र शासनातर्फे सुपर 50 कार्यक्रमाअंतर्गत जे.ई.ई. आणि नीट मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, माऊंट एव्हरेस्ट सर केलेले विद्यार्थी, नागरी सेवा मुख्य परीक्षा पास केलेल्या विद्यार्थीयांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी बांधवांनी ढोल नृत्य आणि तारपा नृत्य सादर केले. यावेळी राज्यपाल महोदयांनी आदिवासी बांधवांनी उभारलेल्या बचत गटाच्या स्टॉल ला भेट दिली