15.09.2025: आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

15.09.2025: गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेऊन उपस्थितांना सुखद धक्का दिला.