15.08.2026 : राज्यपालांचे पुणे येथे ध्वजारोहण
15.08.2026 : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज पुणे येथील विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस बॅन्डसह उपस्थितांनी राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्य गीत गावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, वरिष्ठ नागरिक, लहान मुले, शासकीय अधिकारी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रामुख्याने उपस्थित होते.