15.08.2025: स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांचे पुणे येथील राजभवन परिसरात ध्वजारोहण

15.08.2025: राजभवन, पुणे: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुणे येथील राजभवन परिसरात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी पोलीस दलातील जवानांनी राष्ट्रगीत गायले. राज्यपालांनी उपस्थित राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व उपस्थित लहान मुलांना यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाईचे वाटप केले.