15.04.2026:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एम्स’ नागपूर चा व्दितीय दीक्षांत समारंभ संपन्न
15.04.2026: केंद्रीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) द्वितीय दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे संपन्न झाला. या समारंभात राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॅा. प्रशांत जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात विविध अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या आठ विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात पदवीप्रदान करण्यात आले. त्यानंतर दीक्षांत समारंभात एकूण 210 विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या गौरवार्थ पदव्या व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यामध्ये 129 एमबीबीएस, 29 एमडी/एमएस, 35 बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग, 5 एम.एस्सी. आणि 12 संलग्न व आरोग्यसेवा शाखांतील पदवीधरांचा समावेश आहे.