15.03.2022: राज्यपालांच्या हस्ते लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव सन्मान प्रदान
15.03.2022: लोकमत समूहातर्फे देण्यात येणारे लोकमत कल्याण – डोंबिवली गौरव पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते राजकारण, समाजकार्य, कला, शिक्षण, साहित्य व उद्योग या क्षेत्रातील ५० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, रिजन्सी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक महेश अगरवाल, लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रामुख्याने उपस्थित होते.