14.09.2023 : राज्यपालांनी व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास या विषयावरील परिषदेचे उदघाटन केले
14.09.2023 : भारत व अमेरिकेतील व्यापार वाणिज्य वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करीत असलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण समितीच्या वतीने ‘व्यापार, हवामान बदल और स्थायी विकास’ या विषयावर आयोजित एक दिवसीय परिषदेचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांनी आज एनएससीआय, वरळी, मुंबई येथे केले. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासातील उपमुख्य अधिकारी माइकल श्रेडर, इंडो अमेरिकन चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, मानद सचिव कमल वोरा, महिला उद्योजिका तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.