14.09.2020: जिगाव प्रकल्पासंदर्भात जयंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट

14.09.2020 : बुलढाणा जिल्यातील जिगाव पाटबंधारे प्रकल्पाच्या अडचणी दूर करून तो यथाशिघ्र पूर्ण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. यावेळी राज्यमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, लोकप्रतिनिधी तसेच विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र उपस्थित होते.