14.08.2025: राज्यपालांची पुणे येथील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) येथे भेट

14.08.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुणे येथील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) येथे भेट दिली आणि संस्थेच्या भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) ऑडिओ-व्हिडिओ केंद्राच्या डिजिटल फलकाचे अनावरण केले.सुरुवातीला राज्यपालांनी संस्कृत व कोशविज्ञान विभागाला भेट दिली. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. प्रसाद जोशी यांनी राज्यपालांना डेक्कन कॉलेज परिसराची माहिती दिली. लोकमान्य टिळक विद्यार्थी दशेत महाविद्यालयाच्या वसतिगृहातील ज्या खोलीत वास्तव्यास होते त्या कक्षाला राज्यपालांनी भेट दिली.
राज्यपालांनी पुण्याच्या विविध वारसा वास्तू दाखविणाऱ्या आदी चोरडिया या युवा छायाचित्रकाराच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले व छायाचित्रांचे कौतुक केले.