14.04.2023: अग्निशमन सेवा सप्ताहाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
14.04.2023: महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील १३ अधिकाऱ्यांना व जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके’ प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान देऊन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ केला. सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखाला अग्निशमन सेवा चिन्ह लावले.