14.04.2021: चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन.
14.04.2021: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, समन्वय समितीचे नागसेन कांबळे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.