13.09.2023: राष्ट्रपतींच्या दुरस्थ उपस्थितीत ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा शुभारंभ

13.09.2023 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे देशव्यापी ‘आयुष्मान भव’ या आरोग्य विषयक उपक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रपतींनी ‘आयुष्मान पोर्टल’चे देखील उदघाटन केले. ‘आयुष्मान भव’ उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून करण्यात आला. यावेळी विविध आरोग्यविषयक सेवांचा शुभारंभ करण्यात आला.