13.07.2021 : राज्यपालांच्या उपस्थितीत भारत इस्रायल सहकार्य योजनेचा शुभारंभ
 
                                                13.07.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव्ह फिन्केलस्टीन व इस्रायलच्या पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी सॅमी यहाई यांच्या उपस्थितीत इस्रायलचे पर्यटन मंत्रालय व इस्कॉनशी निगडीत गोवर्धन इको व्हिलेज या संस्थेमार्फत एका सहकार्य योजनेचा शुभारंभ राजभवन येथे करण्यात आला. यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरंग दास, गोवर्धन इको व्हिलेजच्या सामाजिक दायित्व विभागाचे प्रमुख याचनीत पुष्कर्ण तसेच कोकण प्रांत संघचालक डॉ सतीश मोध उपस्थित होते.
 
         
        