13.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’ सोहळा संपन्न

13.05.2025: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ३६ व्या ‘कामगार भूषण पुरस्कार’ व ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार – २०२३’ चे वितरण हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मल्टिस्कील ऑपरेटर, बजाज ॲटो लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना ‘कामगार भूषण पुरस्कार’ तसेच राज्यातील ५१ गुणवंत कामगारांना ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार – २०२३’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला राज्यपालांनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या अर्धाकृती पुतळ्याला, आद्यश्रमिक भगवान विश्वकर्मा व रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘श्रम कल्याण युग विश्वकर्मा गुणवंत कामगार’ या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे विधानसभा सदस्य मनोज जामसुतकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए .कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.