13.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळांचा शुभारंभ
13.01.2025 : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळांचा शुभारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रामकृष्ण मिशन सभागृह, खार येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, रामकृष्ण मिशन धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद, स्वामी तन्नमानंद, स्वामी देवकांत्यानंद, संयोजक शंतनू चौधरी तसेच इतर साधू, विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.