12.08.2026 : राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ११ वा विद्यारंभ समारंभ संपन्न
12.08.2026 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ११ वा विद्यारंभ समारंभ विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद मंडपम सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक व कुलगुरू डॉ. विश्वनाथ कराड, राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक जे. डी. लक्ष्मीनारायण, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, उषा कराड, कुलगुरू प्रा. राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ. सुनिता कराड तसेच विद्यार्थी उपस्थित होते.