12.03.2021: ‘अमृत भारत’ हा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यपाल संपन्न झाला.
12.03.2021: पुढील वर्षी होणार्या भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वार्षिक समारोहानिमित्त राज्यात पुढील ७५ आठवडे विविध कार्यक्रम होणार असून आज पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘अमृत भारत’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय व सांस्कृतिक कार्य संचालक बिभिषण चावरे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘अमृत भारत‘ या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत व नृत्य सादर करण्यात आले.