12.02.2025: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ संपन्न

12.02.2025: सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला.
कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष ऍड भगीरथ शिंदे, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ ज्ञानदेव म्हस्के, प्रभारी कुलसचिव डॉ विजय कुंभार व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ हेमंत उमाप, विद्यापीठाच्या विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, घटक महाविद्यालयांचे प्राचार्य व स्नातक उपस्थित होते. या दीक्षांत समारंभामध्ये ६७९ स्नातकांना पदव्या व सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.