11.12.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत कांदिवली येथे गीता जयंती महोत्सव साजरा
11.12.2024: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कांदिवली, मुंबई येथे गीता जयंती महोत्सव साजरा झाला. महोत्सवाचे आयोजन पोईसर जिमखाना व इस्कॉन जुहूतर्फे करण्यात आले. यावेळी ब्रह्मकुमारी बिंदूबेन, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे तसेच इतर मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते श्रीमदभगवतगीता व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भगवद् गीता शिक्षा अभियान समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे, जुहू इस्कॉनचे अध्यक्ष ब्रज हरी दास, पोईसर जिमखानाचे अध्यक्ष मुकेश भंडारी, टेक्सासचे ऍटर्नी जनरल केन पॅक्सटन आदी यावेळी उपस्थित होते.