11.12.2023: पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ या उपक्रमाचा शुभारंभ केला
11.12.2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला पंतप्रधानांनी यावेळी संबोधित केले. यावेळी राजभवन येथील कार्यशाळेसाठी आलेल्या राज्यातील ६५ विद्यापीठे व शिक्षण संस्थांच्या कुलगुरु व विद्यापीठ प्रमुखांच्या कार्यशाळेला संबोधित करताना राज्यपाल रमेश बैस यांनी ‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यापीठे विकसित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत ‘सक्षम भारतीय’, ‘समृद्ध आणि शाश्वत अर्थव्यवस्था’, ‘नवसंकल्पना, विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ‘सुशासन आणि सुरक्षा’, ‘जगामधील देशात भारत’, ‘विकसित भारत निर्मितीसाठी कृषी व पशुसंवर्धनाची भूमिका’ व ‘विकसित भारत’ उद्दिष्टप्राप्तीमध्ये युवकांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रांमध्ये विविध विद्यापीठांच्या प्रमुखांनी व कुलगुरूंनी आपापले विचार मांडले. माजी मंत्री व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, यांसह राज्यातील ४० विद्यापीठांच्या प्रमुखांनी चर्चासत्रात भाग घेतला.