11.09.2023: राज्यपालांच्या हस्ते मी द सुपरहिरो भारताचा नागरिक’ या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन
11.09.2023: राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘मी द सुपरहिरो भारताचा नागरिक’ या कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, ‘आगम’ संस्थेच्या संस्थापिका व पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व ‘आगम’ संस्थेशी निगडित निमंत्रित उपस्थित होते.