11.08.2023: राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा समाज विज्ञान संस्था व आयसीसीएसए फाऊंडेशनच्या वतीने आयोजित चर्चासत्र संपन्न

11.08.2023: टाटा समाज विज्ञान संस्था व आयसीसीएसए फाऊंडेशनच्या यांच्या वतीने ‘लँडफिल व घनकचरा यातून होणारे मिथेन उत्सर्जन’ या विषयावरील एका चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संस्थेच्या देवनार येथील सभागृहात संपन्न झाले. चर्चासत्राला टाटा समाज विज्ञान संस्थेच्या कुलगुरु डॉ शालिनी भारत, प्रकुलगुरु प्रो. बिनो पॉल, आयसीसीएसए फाउंडेशनचे महासंचालक डॉ जे एस शर्मा, ओएनजीसीचे निवृत्त महाव्यवस्थापक डॉ. अनिल अग्निहोत्री, सीएसआयआरचे ओएसडी डॉ. राकेश कुमार, प्रा. कमल कुमार मुरारी, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.