11.07.2021 : डॉ हेडगेवार रुग्णालयाचे कार्य स्पृहणीय: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
11.07.2021 : औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालयासह विविध वैद्यकीय संस्थांचे संचालन करीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या २०१५-२० या कालावधीच्या पंचवार्षिक अहवालाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अनिल भालेराव, उपाध्यक्ष डॉ. विनोद भीमराजका, महासचिव डॉ. अनंत पांढरे, उद्योजक डॉ. रमेश टेनवाला, सुनील केजरीवाल, रवींद्र संघवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.