11.06.2023: राज्यपालांच्या हस्ते ‘मधू मूर्च्छना’ संस्थेद्वारे आयोजित परंपरा संगीत महोत्सवाचे उदघाटन

11.06.2023: सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने तसेच ‘मधू मूर्च्छना’ संस्थेद्वारे आयोजित परंपरा संगीत महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रंगशारदा सभागृह, वांद्रे मुंबई येथे संपन्न झाले. ज्येष्ठ गायिका व मधू मूर्च्छना ट्रस्ट संस्थेच्या संस्थापिका डॉ शोमा घोष यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात संगीत व नृत्याच्या माध्यमातून देशाच्या कलावैभवाचा अविष्कार दाखविण्यात आला. संगीताला धर्म, जात व भौगोलिक सीमा नसतात. कोणत्याही भाषेत संगीत असले तरी हृदयाला भिडण्याची शक्ती त्यामध्ये असते असे राज्यपालांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी मंत्री कृपाशंकर सिंह, अभिनेते धीरज कुमार, विनोद शेलार, अमरजित मिश्र व इतर मान्यवर उपस्थित होते.