11.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान

11.06.2022 : नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या राजभवन येथे झालेल्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते टाटा यांना ही पदवी बहाल करण्यात आली. दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश व कुलगुरु डॉ हेमलता बागला प्रामुख्याने उपस्थित होते.