11.03.2026: राज्यपालांची चैत्यभुमी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकास भेट तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन
11.03.2026: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज दादर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर दादर चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला देखील भेट दिली.