10.12.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा
10.12.2024: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन राज्य मानवी हक्क आयोगामार्फत करण्यात आले होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्या. के.के. तातेड, आयोगाचे सदस्य श्री.एम.ए. सईद, श्री. संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बांधावरील प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला आणि मुलांची देह विक्रीबाबत जनजागृती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माहितीवर तसेच आदिवासी भागातील समस्या आणि त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करणारी दालने उभारण्यात आली होती, यांची राज्यपाल राधाकृष्णन यांनी पाहणी केली.